माठातील पाणी थंडगार ठेवण्यासाठी या १० चुका टाळा | 10 tips using Matka | Clay Pot Matka Tips Madhura
Description :
नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं पहिलं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे – मेजरींग कप आणि स्पून्स सेट. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons
फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.
We are extremely happy to launch our first kitchen product – Stainless Steel Measuring cup & spoon set. Click below link to order
https://madhurasrecipeclub.com/products/madhuras-recipe-measuring-cup-and-spoons
Send whatsapp message on 8530706977 to order the product
माठ कसा निवडावा?
शक्यतो काळा माठ घ्यावा. माठ विकत घेताना माठ एक हाताने पकडावा. आपल्या अंगाचा स्पर्श होऊ न देता चिमटीने माठ सर्व बाजूने वाजवून बघावा. जर एकसारखा नाद घुमत असेल तर माठ पक्का भाजला गेला आहे असं समजावं. कुठे खणखणीत कुठं बसका नाद घुमला तर माठ कच्चा भाजला गेला आहे असं समजावं. कच्चा भाजलेला माठ गळका निघतो. माठ घेताना त्यात पाणी भरून ५ मिनिटे थांबून बघून घ्यावा.
माठ सीजन कसा करावा?
नारळाची शेंडी किंवा राख घेऊन माठ आतून बाहेरून घासून खंगाळून धुवून घ्यावा. २ दिवस तरी माठात पाणी भरून ठेवावे आणि मग पुन्हा स्वच्छ धुऊन वापरायला घ्यावा.
माठातलं पाणी थंडगार राहावं म्हणून काय करावं?
माठाभोवती ओलं कापड गुंडाळू नये त्याने माठाची नैसर्गिक श्वसनप्रक्रिया बंद पडते. त्यापेक्षा एका कुंड्यात वाळू भरावी आणि तो कुंडा माठाच्या खाली ठेवावा. माठाचा स्पर्श वाळूला व्हायला हवा. वाळूचा नैसर्गीक गुणधर्म थंडावा देणं आहे. माठातील पाणी त्यात उतरल्याने वाळू थंड राहते आणि माठातील पाणीदेखील थंड राहण्यास मदत होते.
माठातील पाणी थंड कसे होते?
माठातून पाणी पाझरले की बाहेरच्या उष्णतेने त्याचे बाष्पीभवन व्हायला मदत होते. पण या प्रक्रियेसाठी ऊर्जा माठातील पाण्याची वापरली जाते आणि त्यामुळे माठातील पाणी थंडगार राहते.
Date Published | 2025-01-31 07:30:02 |
Likes | 2430 |
Views | 179258 |
Duration | 20:14 |